KCC transcript #7199

MAHARASHTRA · NANDURBAR · Bio-Pesticides and Bio-Fertilizers

Query

FARMER ASKED INFORMATION ABOUT PROCEDURE OF MAKING 5% NEEM (OIL) AARK ?

KCC answer

निंबोळी अर्क बनवणे :शेतकरी साहेब, १ एकर साठी ५% निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत- १ दिवसआधी ५ किलो निंबोळी चूर्ण ९ लिटर पाण्यात व दुसऱ्या भांड्यात २०० ग्रॅम साबण चुरा १ लिटर पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी दोन्ही द्रावण लाकडी काठीने दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे. नंतर गाळून दोन्ही मिक्स करून घ्यावे. दुपारी ४ नंतर याची फवारणी करावी. धन्यवाद..! निंबोळी अर्कचे फायदे : शेतकरी साहेब, निंबोळी अर्क किडींच्या प्रजनन क्षमतेवर तसेच मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करतो. मावा, रसशोषक किडी, तुडतुडे, पाने व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, घाटेअळी, पिठ्याढेकुन, अमेरिकन बोंडअळी यांच्या बंदोबस्तासाठी निंबोळी अर्काचा उपयोग होतो असा दावा तज्ञांनी केला आहे. धन्यवाद..! निंबोळी अर्कातील महत्त्वाचा घटक व त्याचे कार्य: कडुलिंबाच्या पाने आणि बियांमध्ये (निंबोळी) ॲझाडीरेक्टीन, निंम्बिन व निंम्बिडिन, मेलियानट्रीओल सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आहेत. जे कीटकनाशकाचे काम करतात. एक एकरची फवारणी साठी निंबोळी अर्क (५%) तयार करायला लागणारे साहित्य : 1. कडुलिंबाच्या सुकलेल्या 5 किलो निंबोळ्या 2. साबणाचा चुरा 200 ग्रॅम 3. स्वच्छ पाणी 100 लिटर 4. गाळण्यासाठी कापड निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत/ कृती : १. फवारणी करण्याच्या १ दिवस आधी ५ किलो चांगल्या साफ केलेल्या व वाळलेल्या निंबोळ्या घ्या. त्या कुटुन किंवा दळून बारीक करा. २. बारीक केलेली निंबोळी पावडर किंवा भुकटी साधारण ९ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. ३. त्याचवेळी दुसऱ्या भांड्यात १ लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम साबणाचा चुरा देखील भिजत ठेवा. हे दोन्ही मिश्रण वेगवेगळे ठेवायचे आहे, एकत्र मिसळू नये. ४. दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे द्रावण दुधासारखे दिसेपर्यंत ढवळावे. ५. त्यानंतर निंबोळी अर्क स्वच्छ कपड्याने गाळून घ्या व तो कपडा ही चांगला पिळून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त निंबोळी अर्क निघेल. ६.साबणाचा चुरा विरघळलेले पाणी त्यामध्ये टाकून चांगले ढवळा. यामुळे द्रावण पिकाच्या पानावर चिटकून राहण्यास मदत होते. ७.नंतर हे द्रावण जवळपास ९० लिटर पाण्यामध्ये मिक्स करा. हा झाला तुमचा 5% निंबोळी अर्क तयार. निंबोळी अर्काचे फायदे : निंबोळी अर्काचा मित्र कीटकावर किंवा परभक्षी घटकावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही. सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते. फवारणीच्या खर्चात बचत होते. कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही. यामुळे निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फवारणी फायदेशीर ठरते. इतर कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येते.  निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो ? निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो काही केळी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर बऱ्याच किडी या अर्काच्या कडवटपणामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. त्यामुळे उपासमारीने मरून जातात. हा अर्क किडींच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो. तसेच मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करतो. निंबोळी अर्क कीटकांवर आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात. धन्यवाद..!
SectorAGRICULTURE
CategoryOthers
CropOthers
SeasonNA
Created (source)2025-05-11T11:34:39.977
Last synced2026-04-03 15:00:03

Official agriculture information: agricoop.gov.in.

FAQ

Is this legal or financial advice?
No. This page reproduces open government transcript data for information only. For schemes, subsidies, or emergencies, contact official agriculture helplines and your local extension officers.
How do I verify the answer?
Compare with current guidance from the Department of Agriculture and Farmers Welfare and official state agriculture portals. Policies and schemes change over time.

About this tool

The Kisan Call Centre (KCC) helps farmers with crop, weather, and scheme-related queries through a national helpline. DeshSeva shows anonymised transcript-style records held in our database so you can explore common questions and responses.

  • DeshSeva does not mirror the full historical record. We sync a bounded sample per state and month.
  • Answers may appear in English, Hindi, Tamil, or other languages as in the source.
  • For programme rules and helpline numbers, rely on agricoop.gov.in and your state agriculture department.